राजुरीत हरिनाम सप्ताहाला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरीत हरिनाम सप्ताहाला सुरवात
राजुरीत हरिनाम सप्ताहाला सुरवात

राजुरीत हरिनाम सप्ताहाला सुरवात

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २१ : राजुरी (ता. जुन्नर) या ठिकाणी श्रावण मासातील श्री हनुमान उत्सवाच्या निमित्ताने रविवार दि.२१ पासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात झाली आहे. या निमित्ताने काकडा, श्री तुकाराम महाराज गाथा भजन, हरिपाठ या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर रात्री सात ते नऊ या वेळेत महाराष्ट्र नामवंत असलेले सर्वश्री विशाल महाराज हाडवळे, संदीप महाराज डुंबरे, भागवत महाराज साळुंखे, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, अनिल महाराज पाटील, एकनाथ महाराज शास्त्री, जगदीश महाराज जोशी, उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन होणार आहे. त्यामुळे परीसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट व इतर देवस्थान कमिटीच्या वतीने अध्यक्ष मुरलीधर औटी यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01006 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..