आळेफाटा पोलिस ठाण्यातील गणपतीचे विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा पोलिस ठाण्यातील गणपतीचे विसर्जन
आळेफाटा पोलिस ठाण्यातील गणपतीचे विसर्जन

आळेफाटा पोलिस ठाण्यातील गणपतीचे विसर्जन

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ५ : आळेफाटा पोलिसांनी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ठेका
धरला. संपूर्ण राज्यात गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. यात आळेफाटा (ता. जुन्नर) येथील पोलिस ठाण्यात गणपतीची स्थापना केली होती. अनंत चतुर्थीला पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागत असल्याने आळेफाटा पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बँण्डपथकावर ठेका धरत रविवारी गणरायाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणाही दिल्या. एक-सारखा पोषक परिधान करत बँण्डवर ठेका धरणाऱ्या सर्वच पोलिस दादांनी नृत्याचा आनंद घेतला.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01036 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..