आळेफाटा परिसराला पुन्हा पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा परिसराला
पुन्हा पावसाने झोडपले
आळेफाटा परिसराला पुन्हा पावसाने झोडपले

आळेफाटा परिसराला पुन्हा पावसाने झोडपले

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ८ : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील आळे, वडगाव आनंद, राजुरी, कोळवाडी, उंचखडक, बोरी बुद्रुक, माळवाडी, वडगाव कांदळी या गावांना बुधवारी (ता. ६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन तास मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे या परिसरातील ओढे-नाल्यांना पूर आला होता.
राजुरी गावात एका आठवड्यात दोन वेळा ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाल्याला. त्यामुळे शेतात पाणी साचल्याने सोयाबिन, मका, उडीद, मुग ही पिके पाण्याने सडू लागली आहेत. या परिसरात बुधवारी परत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणीच पाणी दिसत होते. या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले असून, त्याची भरपाई मिळण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01046 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..