गुळुंचवाडी येथील महिलेचा डोंगरावर आढळला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुळुंचवाडी येथील महिलेचा
डोंगरावर आढळला मृतदेह
गुळुंचवाडी येथील महिलेचा डोंगरावर आढळला मृतदेह

गुळुंचवाडी येथील महिलेचा डोंगरावर आढळला मृतदेह

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १० : गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथील १० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ज्येष्ठ महिलेचा मृतदेह वन्य प्राण्याने खाल्लेल्या अवस्थेत डोंगरावर आढळून आला.
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याने माहिती दिली की, गुळुंचवाडी येथील हिराबाई होनाजी काळे (वय ६५) या रोज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी बांधूडे डोंगराकडे घेऊन जात व सायंकाळी पाचच्या सुमारास घरी येत असत. मात्र, ३० ऑगस्ट रोजी त्या सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी डोंगरावर निघून गेल्या, मात्र सायंकाळी पाच वाजून गेले तरी घरी आल्या नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी शेतात व आजूबाजूला परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, शेळ्या मिळून आल्या परंतु हिराबाई या आढळल्या नाहीत. घरातील मंडळींनी सर्व नातेवाइकांकडे शोधाशोध केली. अखेर ७ सप्टेंबर रोजी आळेफाटा पोलिसांत त्या हरवल्याची खबर दिली. दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नातेवाईक व ग्रामस्थांनी डोंगरावर शोधाशोध सुरू केली असताना बांधुडे डोंगरावर एका झाडाला हिरव्या रंगाची साडी दिसली व बाजूला शरीराचे अवशेष दिसले. नातेवाइकांनी अवशेष व साडी ओळखली. एखाद्या जंगली प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे नातेवाइकांनी वन खात्याचे अधिकारी व पोलिसांना कळविले. याबाबतची खबर संतोष होनाजी काळे (वय २५) यांनी आळेफाटा पोलिसांना दिली.
दरम्यान, येथील ग्रामस्थांच्या अंदाजानुसार संबंधित ज्येष्ठ महिलेला बिबट्यानेच हल्ला करून ठार मारले आहे. त्यामुळे या परिसरात असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01050 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..