गोमाता दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांच्या पशुधनाचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोमाता दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांच्या पशुधनाचे लसीकरण
गोमाता दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांच्या पशुधनाचे लसीकरण

गोमाता दूध उत्पादक संस्थेतर्फे सभासदांच्या पशुधनाचे लसीकरण

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१५ : वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने गवळीबांधव व सभासदांच्या पशुधनाचे‌ मोफत लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक गडगे यांनी दिली.
गावातील सुमारे ६०० जनावरांची तपासणी मोफत करण्यात आली. पशुधनास डॉ.श्रीरंग बढे, डॉ. सिध्दार्थ गाडगे, डॉ ‌‌‌‌‌‌‌.हर्षल हाडवळे, डॉ.संजय घंगाळे यांनी लसीकरण केले.

तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.महेश शेजाळ लम्पी रोगाची बाधा बैलांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच देशी नावरे या विषाणुला अधिक बळी पडत आहे. पशुपालकांनी घाबरुन न जाता लम्पी सदृष्य लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून केले आहे.

याप्रसंगी सुरेश गडगे, राहुल खोकले, गणेश देवकर, विलास गडगे, राजाराम भुजबळ, गोपाळ फुलसुंदर, रेश्मा चौगुले, सविता शिंदे, रामदास वाळुंज, सचिव अभिषेक कोकाटे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

01842

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01066 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..