शरदचंद्र पतसंस्थेचा ९ टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरदचंद्र पतसंस्थेचा ९ टक्के लाभांश
शरदचंद्र पतसंस्थेचा ९ टक्के लाभांश

शरदचंद्र पतसंस्थेचा ९ टक्के लाभांश

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ३० : राजुरी (ता. जुन्नर) येथील शरदचंद्र पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ९ टक्के लाभांश देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष एम. डी. घंगाळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेच्या राजुरी, आळेफाटा, आणे, ओतूर, पारगावतर्फे मढ, नारायणगाव, निळवंडे, जांबूत, सावरगाव, भोसरी, घाटकोपर, वाशीतर्फे मुंबई या बारा शाखा असून, या पतसंस्थेची ३० वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. २९ रोजी) राजुरी येथे मुख्य कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष घंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माउली शेळके, ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी. के. औटी, उपाध्यक्ष राजेंद्र औटी, खजिनदार भीमाजी मालुसकर, सचिव दत्तात्रेय गंधट, अनंतराव गटकळ, नरेंद्र गटकळ, प्रमोद पाटील औटी, अशोक औटी, संजय पिंगळे, तुळशीराम हाडवळे, संजय पिंगळे, विवेक शेळके, संतोष चव्हाण, शालिनी हाडवळे, वैशाली औटी, शांता गवळी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्‍याम आर्वीकर, व्यवस्थापक महावीर व्हनुरे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष घंगाळे म्हणाले, ‘‘संस्थेच्या सभासदांची संख्या १२ हजार ५८३ असून, ठेवी १६७ कोटी ३६ लाख ३८ हजार ४४४ रुपये असून, १०१ कोटी ९२ लाख ६५ हजार ५३९ रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. संस्थेला नफा १ कोटी ३१ लाख २ हजार ९३१ रुपये झाला आहे.’’