सर्पदंश झाल्यावर मांत्रिकाकडे न जाता डॉक्टरांकडे जा : डॉ. सदानंद राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्पदंश झाल्यावर मांत्रिकाकडे न जाता डॉक्टरांकडे जा : डॉ. सदानंद राऊत
सर्पदंश झाल्यावर मांत्रिकाकडे न जाता डॉक्टरांकडे जा : डॉ. सदानंद राऊत

सर्पदंश झाल्यावर मांत्रिकाकडे न जाता डॉक्टरांकडे जा : डॉ. सदानंद राऊत

sakal_logo
By

आळेफाटा, ता.३ : सर्पदंश झाल्यावर बॅडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे ४ इंच रुंदीचे पट्टे वापरावेत. दोरीने करकचून बांधू नये. त्यामुळे गॅग्रीन होण्याची शक्यता असते. डॉक्टरांकडे गेल्यावर वैद्यकीय तपासण्या व उपचार लक्षणांवरून कोणता साप चावला आहे हे ओळखता येते. मात्र सर्पदंश झाल्यास मांत्रिकाकडे न जाता डॉक्टरांकडे जा, असे आवाहन राजुरी, उंचखडक (ता.जुन्नर) येथील भैरवनाथ नवरात्रौत्सवानिमित्त सर्परोगतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांचे व्याख्यान आयोजित केले होते

भारतात नाग, मण्यार, घोणस आणि सुरसे या चारही विषारी सर्पदंशावर एकच लस उपलब्ध आहे.तसेच साप चावल्यास त्या माणसाला चक्कर येणे ,उलटी होणे,थंडी वाजणे त्वचा चिकट होणे ही लक्षणे दिसतात. जगाच्या तुलनेत भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ निम्या म्हणजे २८ लाख लोकांना सर्पदंश होतो व ५० हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
सयाजी हाडवळे यांनी सूत्रसंचलन केले तर संजू बाबा हाडवळे यांनी आभार मानले.

01931