बोरी बुद्रुकमध्ये आढळला दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी बुद्रुकमध्ये आढळला
दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह
बोरी बुद्रुकमध्ये आढळला दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह

बोरी बुद्रुकमध्ये आढळला दुसऱ्या तरुणाचाही मृतदेह

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ३ : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे कुकडी नदीच्या पात्रात शनिवारी (ता. १) पोहण्यासाठी गेलेल्या अनिल संपत धुळे या युवकाला वाचवण्यासाठी गेलेले बापू धुळे व अमोल धुळे हे युवक नदीच्या पात्रात बेपत्ता झाले होते. त्यांचा शनिवारपासून स्थानिक नागरिक व शासनाच्या पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत शोध कार्य चालू होता. रविवारी बापू यांचा मृतदेह सापडला, तर शनिवारी अमोल धुळे याचा मृतदेह घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर नदीच्या पात्रात आढळला.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मंडलाधिकारी नितीन चौरे, तलाठी शीतल गर्जे, सरपंच वैशाली जाधव, ग्रामसेवक बाळासाहेब बेंद्रे, मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे सहकारी, आळेफाटा येथील पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर उपस्थित होते. तहसीलदार सबनीस यांनी संबंधित कुटुंबाचे सांत्वन करून येणाऱ्या अडचणीत योग्य ती मदतीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.