बिबट्याच्या हल्ल्यात राजुरी येथे घोडी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या हल्ल्यात
राजुरी येथे घोडी ठार
बिबट्याच्या हल्ल्यात राजुरी येथे घोडी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात राजुरी येथे घोडी ठार

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ६ : राजुरी (ता. जुन्नर) येथे गुरुवारी (ता. ६) पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय घोडी ठार झाली.
राजुरी येथील संतोष सुरेश औटी यांचा घराजवळच गायांचा गोठा असून, त्यांनी या घोडीला गायांच्या बाजूला बांधले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्याला असलेल्या जाळीच्या वरून उडी मारून आतमध्ये प्रवेश करून घोडीवर हल्ला करून मारून टाकले. घोडीवर झालेल्या हल्ल्याने गायांचा ओरडण्याचा आवाज आला असता औटी हे गोठ्याजवळ आले. त्यावेळी बिबट्या गोठ्यामध्येच होता. त्यांनी मोठ्याने ओरडल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. परंतु, या हल्ल्यात घोडीचा मृत्यू झाला.
दरम्यान, औटी यांनी पंधरा दिवसांपूर्वीच ७५ हजार रुपयांची ही घोडी खरेदी केली होती. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या परिसरात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे या परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मुक्ताजी औटी यांनी केली.