वन्यजीव सप्ताहानिमित्ताने संभाजी विद्यालयात उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यजीव सप्ताहानिमित्ताने
संभाजी विद्यालयात उपक्रम
वन्यजीव सप्ताहानिमित्ताने संभाजी विद्यालयात उपक्रम

वन्यजीव सप्ताहानिमित्ताने संभाजी विद्यालयात उपक्रम

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ९ ः बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील श्री संभाजी विद्यालयात वनविभाग जुन्नरच्या वतीने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.

यावेळी वनपरिक्षेत्र निमगावसावाचे भानुदास शिंदे, विशाल गुंड, सर्पमित्र ऋषिकेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

भानुदास शिंदे म्हणाले की, मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था नष्ट होत आहेत. त्या टिकल्या पाहिजेत म्हणजेच अन्नसाखळी टिकून राहील व जंगलातील प्राणी मानवी वस्तीकडे येणार नाहीत. पर्यायाने त्यांचा उपद्रव कमी होऊन ते मनुष्यावर हल्ला करणार नाहीत.

ऋषिकेश गायकवाड यांनी सर्पदंश होऊ नये व झाल्यास काय काळजी घ्यावी, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण लोहकरे यांनी केले. शिवाजी कुमकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
---------------------