पॉलिश करण्याच्या बहाण्याने सात तोळ्यांचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॉलिश करण्याच्या बहाण्याने
सात तोळ्यांचे दागिने लंपास
पॉलिश करण्याच्या बहाण्याने सात तोळ्यांचे दागिने लंपास

पॉलिश करण्याच्या बहाण्याने सात तोळ्यांचे दागिने लंपास

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १३ ः दागिन्यांना पॉलिश करुन देतो, असे सांगून बेल्हे येथील एका ज्येष्ठ महिलेचे ७ तोळयांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेल्हे (ता. जुन्नर) येथील वाडेकर वस्तीवर राहत असलेल्या नानुबाई तुकाराम वाडेकर (वय ७०) यांना दुपारच्या सुमारास आलेल्या दोघांना दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर वाडेकर यांनी विश्वास ठेऊन सोन्याचे गंठण, पाटल्या दिल्या. चोरट्यांनी ते दागिने एका डब्यात टाकून त्यात हळद टाकून गरम करायला सांगितले व हे करत असताना महिलेची नजर चुकवून डब्यात टाकलेले दागिने हातचलाखीने काढून घेतले. ते दोघेजण निघून गेल्यावर काही वेळाने वाडेकर यांनी डब्यात पाहिले असता दागिने नसल्याचे निदर्शनास आले.

दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून हातचलाखीने दागिने चोरण्याचे प्रमाण वाढलेले आहे. विशेष करून महिलांनी याची काळजी घ्यावी. अशी अज्ञात व्यक्ती घरी आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे.
-------------------