बोरी बुद्रूक येथील तंटामुक्त अध्यक्षपदी युवराज कोरडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी बुद्रूक येथील तंटामुक्त 
अध्यक्षपदी युवराज कोरडे
बोरी बुद्रूक येथील तंटामुक्त अध्यक्षपदी युवराज कोरडे

बोरी बुद्रूक येथील तंटामुक्त अध्यक्षपदी युवराज कोरडे

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १५ : बोरी बुद्रूक (ता. जुन्नर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी युवराज कोरडे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच वैशाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या ग्रामसभेमध्ये हि निवड केली तसेच कार्याध्यक्षपदी रंजन नाना जाधव व उपाध्यक्षपदी सुरेश जाधव यांची एकमताने निवड केली.

यावेळी उपसरपंच दिनेश जाधव, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मोहन पटाडे, सचिव माऊली जाधव,
बाळासाहेब कोरडे, चेतन कोरडे, शिवाजी पटाडे, बाळासाहेब पाटोळे, अशोक कोरडे, सुदाम जाधव, नारायण कोरडे, संतोष तांबे, अशोक जाधव, कुंडलिक नाना शिंदे, अजित डेरे, तलाठी शीतल गर्जे, ग्रामसेवक खैरे भाऊसाहेब, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.