Pune सांग सांग भोलानाथ, पाऊस जाईल काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bholanath.jpg
सांग सांग भोलानाथ, पाऊस जाईल काय?

Pune : सांग सांग भोलानाथ, पाऊस जाईल काय?

आळेफाटा : ''सांग सांग भोलानाथ, पाऊस जाईल काय?'' असं म्हणण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा राज्याच्या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झाला आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दसरा सन संपल्यावर ग्रामीण भागात पहाटेच्या सुमारास नंदीवाले घरोघरी येत असतात. सध्या हा आळेफाटा (ता.जुन्नर) परिसरातील गावांमध्ये नंदीवाले दारोदारी जात असून लोक त्यांना ''भोलानाथ पाऊस जाईल का? असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. परंतु या प्रश्नाचा सराव नंदीला नसल्याने याचे उत्तर काही नंदीला देता येत नाही.

आम्ही पिढ्यान पिढ्या हा व्यवसाय करत असून, पूर्वी लोक नंदीला विचारायचे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय परंतु आता लोक नंदीला जो तो पाऊस कधी जाईल असा प्रश्न विचारत आहेत, असे सदाशिव फुलमाळी नंदीवाले यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.