बोरी शिरोली ते मंचर रस्त्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी शिरोली ते मंचर रस्त्याची दुरवस्था
बोरी शिरोली ते मंचर रस्त्याची दुरवस्था

बोरी शिरोली ते मंचर रस्त्याची दुरवस्था

sakal_logo
By

आळेफाटा, ता.२३ : शिरोली ते मंचर या रस्त्याची ठिक ठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झालेली आहे. यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची परिसरातील त्रस्त ग्रामस्थांकडून होत आहे.
मंचर या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी येण्याजाण्यासाठी बोरी बुद्रुक, साळवाडी, शिरोली, रांजणी आदी गावांमधील ग्रामस्थांना हा रस्ता अत्यंत जवळचा असल्याने येथील ग्रामस्थ याच रोडचा वापर करत आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा लहान मोठे अपघात होत आहेत. त्यातच येथील काही ग्रामस्थांनी पाइपलाइन करण्याकरिता रस्ता खोदून काम पाइपलाइन केली. परंतु हे काम झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावर वरच्यावर माती टाकून तसेच सोडून दिलेले आहे. यामुळे या ठिकाणी वाहने जाऊन मोठाले खड्डे झालेले आहे. ते अपघाताला निमंत्रण देत आहेत.
रस्त्याचे रुंदीकरण देखील व्हावे, अशी मागणी होत असून, या रस्त्यावरून मोठाल्या वाहनांना खूप अडचणी येत असून, समोरासमोरून जर दोन वाहणे आली तर खाली कोणी उतरायचे यावरुन वाहनचालकांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण लवकरात लवकर करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.


02020