राजुरी येथे मुस्लिम बांधवांना दिवाळी फराळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरी येथे मुस्लिम बांधवांना दिवाळी फराळ
राजुरी येथे मुस्लिम बांधवांना दिवाळी फराळ

राजुरी येथे मुस्लिम बांधवांना दिवाळी फराळ

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १ ः राजुरी (ता. जुन्नर) येथे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके व राजुरीचे विद्यमान उपसरपंच माऊली शेळके यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आळेफाटा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन चालण्याची शेळके परिवाराची भूमिका कौतुकास्पद असल्याचे माजी सदर अकबर भाई पठाण म्हणाले.
या प्रसंगी सरपंच प्रिया हाडवळे, वल्लभ शेळके, जाकीर पटेल, गनी पटेल, रईस चौगुले, हाजी अब्दुल्ला, मुबारक तांबोळी, आबू पठाण, नजीर शेख, महंमद भाई पटेल, जिलानी पटेल, सलीम पटेल, हसन पटेल, मन्सूर चौगुले, आयुब पटेल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश हाडवळे व शाकीर चौगुले यांनी केले. आभार वल्लभ शेळके यांनी मानले.