किल्ले बनवा स्पर्धेत जान्हवीची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले बनवा स्पर्धेत जान्हवीची बाजी
किल्ले बनवा स्पर्धेत जान्हवीची बाजी

किल्ले बनवा स्पर्धेत जान्हवीची बाजी

sakal_logo
By

आळेफाटा, ता.२ : राजुरी (ता.जुन्नर) येथे आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत जान्हवी औटी हिने प्रथम क्रमांक पटकाविला, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य जि.के.औटी यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने दीपावलीनिमित्त किल्ले बनवा या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ५५५५ रुपयांचे बक्षीस जान्हवी संतोष औटी हिने पटकाविले तर द्वितीय क्रमांकाचे ४४४४ रुपयांचे बक्षीस वेदांत सुनील औटी यास मिळाले तसेच तृतीय क्रमांक ३३३३ मानसी संतोष ताजवे हिचा आला. चतुर्थ क्रमांकाचे २२२२ रुपयांचे बक्षीस आयुष प्रल्हाद औटी यांना देण्यात आले व पाचवे क्रमांकाचे ११११ रुपयांचे बक्षीस आयुष संतोष हाडवळे यास देण्यात आला. ५५५ रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस अक्षय सुनील जाधव यांस देण्यात आले. या स्पर्धा शरदचंद्र पतसंस्थेच्या प्रथम, आदर्श महिला पतसंस्थेतर्फे द्वितीय, डॉ.गणेश घंगाळे तृतीय, सचिन हाडवळे चतुर्थ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप औटी यांच्या वतीने पाचव्या क्रमांकासाठीच्या बक्षीसांची रक्कम दिली. तसेच डॉ.धनंजय मोरे यांनी विजेत्यांना ट्रॉफी देण्यात आली.
जुन्नर तालुक्याचे माजी सभापती व राजुरीचे ग्रामीण नेते दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके जनता विकास मंडळाचे खजिनदार शाकीर चौगुले, संदीप औटी, गणेश हाडवळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील पवार, अर्जुन आवारी, राजेंद्र गाडेकर यांनी केले.

02044