वडगाव आनंद येथे २५ वर्षांनी भरला पुन्हा तोच वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव आनंद येथे २५ वर्षांनी भरला पुन्हा तोच वर्ग
वडगाव आनंद येथे २५ वर्षांनी भरला पुन्हा तोच वर्ग

वडगाव आनंद येथे २५ वर्षांनी भरला पुन्हा तोच वर्ग

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ३ : वडगाव आनंद येथील रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयात २५ वर्षांनी इयत्ता दहावीचा वर्ग पुन्हा भरला. वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयातील सन १९९५-९६ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. या वेळी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास सुमारे ४५ माजी विद्यार्थी उपस्थित होते.
माता कळमजाईच्या दर्शनाने आणि दीपप्रज्वलनाने या स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली. तसेच शालेय शिक्षकांपैकी व शालेय जीवनातील सहकारी मित्रांपैकी दिवंगत झालेल्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आजवरची वाटचाल तसेच शाळेतले जुने किस्से अनुभव कथन करत कवितांनी स्नेहमेळाव्याची रंगत वाढवली. पंचवीस वर्षांपूर्वी दहावीत असणारे विद्यार्थी आज पुन्हा शाळेतील आठवणी जागवत एकत्र आले. जुने किस्से, शाळेत शिक्षकांनी केलेली शिक्षा, छोट्याशा गोष्टींवरुन एकमेकांशी झालेले वाद आणि पुन्हा ‌झालेली गट्टी या साऱ्या गोष्टींना‌ उजाळा देताना कधी हास्याच्या लकेरी तर कधी ओलावलेल्या डोळ्याच्या कडा मंतरलेल्या दिवसांची पुन्हा एकदा अनुभूती देवून गेली. स्नेहमेळाव्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केल्याबद्दल गोपीनाथ शिंदे, गोरक्षनाथ पाटील देवकर, सचिन काशिकेदार, सतीश चासकर, शंकर गडगे, सतीश वाळुंज व शीतल कुटे सुपेकर यांचे सर्वांनीच आभार मानले.