राजुरी येथील मंदिरात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरी येथील 
मंदिरात चोरी
राजुरी येथील मंदिरात चोरी

राजुरी येथील मंदिरात चोरी

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ३ : राजुरी (ता. जुन्नर) येथील श्री खंडेराया भैरवनाथ देवस्थान मंदिराचा दरवाजा तोडून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
राजुरी येथील आवटे वाडी वस्तीवर असलेले श्री खंडेराया भैरवनाथ देवस्थान मंदिर चोरट्यांनी गुरुवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास फोडले. मंदिराचे पुजारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पूजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिराचा पाठीमागील असलेला दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना मंदिरातील दानपेटी फोडलेली दिसली. तसेच, तीन घंटा, स्पीकर सेट, कॉम्प्युटर, असा एकूण दोन ते अडीच लाख रुपयांचे साहित्य व दानपेटीत असलेली रक्कम, असा एकूण दोन ते अडीच लाख रुपयांची चोरी झाली. तसेच, मंदिराचा बाजूला असलेल्या वरसूबाई मंदिराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चोरट्यांना ते कुलूप तोडता न आल्याने या ठिकाणचा चोरीचा प्रयत्न फसला.घटनास्थळी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी भेट‌ देऊन पाहणी केली.