आळेफाटा येथील उजबाजारात २९ हजार पिशव्यांची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा येथील उजबाजारात २९ हजार पिशव्यांची आवक
आळेफाटा येथील उजबाजारात २९ हजार पिशव्यांची आवक

आळेफाटा येथील उजबाजारात २९ हजार पिशव्यांची आवक

sakal_logo
By

आळेफाटा, ता.९ : येथील (ता. जुन्नर) उपबाजारात मंगळवारी (ता. ८) कांद्याची २९ हजार ६७९ पिशव्यांची आवक झाली. बाजारात प्रतवारी नुसार एक नंबर कांद्यास दहा किलोस ३०० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोढ्यांच्या उपबाजारात कांद्यास दहा किलोस २४० ते ३०० रुपये बाजार भाव मिळाला तसेच दोन नंबर कांद्यास १९० ते २४० रुपये बाजारभाव मिळाला. तर कमी दर्जाच्या कांद्यास दहा किलोस १५० ते २१० रुपये बाजारभाव मिळाला. तीन नंबर ११० ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. गोल्टा कांद्यास दहा किलोस ७० ते ११० रुपये बाजारभाव मिळाला. बदला चिंगळी कांद्यास दहा किलोस ५० ते १२० रुपये बाजारभाव मिळाला आहे. दरम्यान, आळेफाटा येथील उपबाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन देखील असून बाजारभाव वाढ झालेली दिसून येत आहे.