संत नामदेव महाराज यांच्या रथाचे आळेफाटा येथे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत नामदेव महाराज यांच्या
रथाचे आळेफाटा येथे स्वागत
संत नामदेव महाराज यांच्या रथाचे आळेफाटा येथे स्वागत

संत नामदेव महाराज यांच्या रथाचे आळेफाटा येथे स्वागत

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ९ : संत नामदेव महाराज यांच्या रथाचे आळेफाटा येथे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या पंढरपूर ते घुमान (पंजाब) भव्य रथ व सायकल यात्रेचे आळेफाटा (ता.जुन्नर) येथे जोरदार स्वागत करण्यात आले. ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजी डोके, सरपंच प्रीतम काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, दिलीप वाव्हळ, पांडुरंग काळे, उमेश खोले, गणेश काळे, राजेंद्र वनारसे, गणेश नांगरे आदी या वेळी उपस्थित होते. महाराजांचा रथ आळे गावात आल्यानंतर भजन म्हणत फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नामदेव महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली.