बोरी खुर्द येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी खुर्द येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
बोरी खुर्द येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

बोरी खुर्द येथे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १५ : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिनाचे औचित्य साधत बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘समतोल फाउंडेशन’च्या वतीने शालेय दप्तर वाटप केले. याप्रसंगी समतोल फाउंडेशनचे संस्थापक सचिव विजय जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले की, निरोगी व भयमुक्त बालके हेच राष्ट्राचे भविष्य आहे. बालकांची काळजी, संरक्षण, संवर्धन व संगोपनाची जबाबदारी ही समाजातील प्रत्येक घटकाची आहे. घरदार सोडलेल्या, रस्त्यावर व प्लॅटफॉर्मवर भीक मागणाऱ्या व अंधकारमय जीवन जगणाऱ्या बालकांना प्रकाशमय भविष्य समतोल फाउंडेशन देत आहे.
याप्रसंगी पुणे जिल्हा रहिवासी उत्कर्ष मंडळाचे सचिव व ज्येष्ठ नाट्यकर्मी रवींद्र औटी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नामदेव पवार, रंगनाथ बांगर, शिवाजी बेल्हेकर, दीपक बेल्हेकर, सुभाष बांगर, महेंद्र काळे, गोरख शेटे, विठ्ठल जाधव, प्रगती सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शेळकंदे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. अशोक हांडे यांनी सूत्रसंचालन केले.