आळेफाटा येथील ‘स्ट्रॉबेरी इंग्लिश मेडीअम’ मध्ये बालदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा येथील ‘स्ट्रॉबेरी इंग्लिश मेडीअम’ मध्ये बालदिन साजरा
आळेफाटा येथील ‘स्ट्रॉबेरी इंग्लिश मेडीअम’ मध्ये बालदिन साजरा

आळेफाटा येथील ‘स्ट्रॉबेरी इंग्लिश मेडीअम’ मध्ये बालदिन साजरा

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १५ : आळेफाटा (ता.जुन्नर) येथील स्ट्रॉबेरी इंग्लिश मेडिअम संकुलच्या वतीने
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून संगीत खुर्ची, आंधळी कोशिंबीर, लंगडी, रस्सीखेच, अशा विविध पारंपारिक खेळांचे आयोजन केले होते.
नेहरू यांना मुले प्रेमाने चाचा म्हणत असत. त्यांच्या जयंतीच्या दिवशी बालदिन का साजरा केला जातो, या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रमिझा शेख, असरार शेख, नीलेश शेळके, तुषार गाडगे, पुनम लेंडे आदी उपस्थित होते.