कांदा बियाणे करताना उगवणक्षमता तपासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा बियाणे करताना उगवणक्षमता तपासा
कांदा बियाणे करताना उगवणक्षमता तपासा

कांदा बियाणे करताना उगवणक्षमता तपासा

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १५ : ‘‘शेतकऱ्यांनी कांदा बियाणे तयार करताना उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे. तसेच, दुबार लागवड करताना गादीवाफे तयार करून योग्य त्या अंतराने लागवड करणे व ठिबक सिंचनने करून पाणी नियोजन करावे. साठवणूक नियोजन करताना हवा खेळती राहण्यासाठी ‘व्ही’ आकाराची जागा ठेवावी,’’ असा सल्ला कांदा, लसूण संशोधन केंद्राचे (पुणे) वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. राजीव काळे यांनी दिला.
वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कांदा व गहू पीक कार्यशाळा आणि सुविधा केंद्राचे उद्‍घाटन सुविधा केंद्राचे उद्‍घाटन जुन्नरचे सहायक निबंधक सचिन सरसमकर व डॉ. राजीव काळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे, डॉ. योगेश यादव, सुजित कैसरे, अनंत गव्हारे, दिनेश गायकवाड, जितेंद्र असाले, कृषी सहायक महाजन, ‘आत्मा’चे सूर्यकांत विरणक, संस्थेचे चेअरमन सचिन वाळूंज, सोसायटीचे अध्यक्ष सचिन वाळुंज, उपाध्यक्ष प्रमोद गडगे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत शेतकरी गट तयार करणे, शेतकरी प्रशिक्षण, उत्पादन नियोजन, पाणी नियोजन, जैविक शेती, कांदा साठवणूक नियोजन, या व अन्य अनेक विषयांवर चर्चा करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.