वारकरी साहित्य परिषदेच्या सचिवपदी शेरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारकरी साहित्य परिषदेच्या सचिवपदी शेरकर
वारकरी साहित्य परिषदेच्या सचिवपदी शेरकर

वारकरी साहित्य परिषदेच्या सचिवपदी शेरकर

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १६ : वारकरी साहित्य परिषदेच्या सांप्रदायातील जिल्हा सचिवपदी नियुक्तीचे पत्र शिरोली बुद्रुकचे माजी सरपंच, पत्रकार लक्ष्मण शेरकर यांना तुकाराम महाराजांचे थेट अकरावे वंशज तथा वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत महाराज मोरे यांचे हस्ते देण्यात आले.
राजुरी (ता. जुन्नर) येथे पार पडलेल्या परिषदेच्या वर्धापन दिन व वैष्णव मेळावा कार्यक्रमात त्यांना गौरवण्यात आले. या वेळी माजी आमदार शरद दादा सोनवणे, युवा कीर्तनकार पंकज महाराज गावडे, परिषदेचे सह सचिव श्यामराव गायकवाड, सचिव डॉ. सदानंद महाराज मोरे, जि. प. सदस्य पांडुरंग पवार, माजी सभापती दीपक औटी, ग्राहक मंचाचे प्रांत संघटक बाळासाहेब औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, एम. डी. घंगाळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात इतरही पदांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यामध्ये आनंदराव महाराज कदम (जिल्हा-खजिनदार) पांडुरंग महाराज घुले-मांजरी (कार्याध्यक्ष-हवेली तालुका), स्वाती गोडसे-जिल्हा संपर्क आणि प्रसिद्धी प्रमुख डॉ. अहेफाज मुलाणी विभाग प्रमुख- हवेली), वंदना मारुती खोत (सदस्य-पिंपरी चिंचवड कार्यकारिणी), ज्ञानेश्वर मिडगुले (जिल्हा कार्यकारिणी सदस्य), डॉ. अनुष्का शिंदे, जुन्नर तालुका महिला कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आली.