लवणवाडी, कोळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लवणवाडी, कोळवाडीच्या जिल्हा परिषद 
शाळेसाठी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त
लवणवाडी, कोळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त

लवणवाडी, कोळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १७ ः विधान परिषद सदस्य आमदार अरुण गणपती लाड यांच्याकडून लवणवाडी आळे व कोळवाडी ज्ञानेश्वर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची खोली व संरक्षक भिंत बांधकामासाठी अनुक्रमे १० लक्ष व ८ लक्ष निधी प्राप्त झाला.
सदर निधी मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे निवृत्त तपासणी अधिकारी यशवंत रामजी कुऱ्हाडे व ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील सुरेश कुऱ्हाडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत होता. आमदार अरुण लाड व सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य तथा गटनेते शरद लाड यांनी निधी दिल्याबद्दल पलूस (ता. कुंडल, जि. सांगली) येथे जाऊन कोळवाडीचे उपसरपंच दिनेश सहाणे, सुरेश कुऱ्हाडे, यशवंत कुऱ्हाडे यांनी सत्कार केला. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी शिफारसपत्र देऊन आमदार लाड यांना निधी देण्यास सांगितले.