वडगाव आनंद येथील महिला बचत गटांचा कर्ज मंजुरी वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव आनंद येथील महिला 
बचत गटांचा कर्ज मंजुरी वाटप
वडगाव आनंद येथील महिला बचत गटांचा कर्ज मंजुरी वाटप

वडगाव आनंद येथील महिला बचत गटांचा कर्ज मंजुरी वाटप

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ७ ः सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील उद्योगिनी, प्रेरणा, हिरकणी या तीन महिला बचत गटांना प्रत्येकी दीड लाख सादर मंजूर प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
ग्रामीण भागातील विविध होतकरू, गरजू महिलांना अर्थ साहाय्य होण्याच्या दृष्टीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत शाखाधिकारी विजय पाळंदे यांच्या मार्फत मंजुरी देण्यात आली. अल्प व्याज दरातील कर्ज मंजुरी झाल्याबाबतचा धनादेश व कर्ज मंजुरी पत्र महिला बचत गटाच्या महिलांना सुपूर्त करण्यात आले. या कर्ज रक्कमेतून महिला समूह शेती, हॉटेल व्यवसाय, शिलाई व्यवसाय, ब्युटी पार्लर असे विविध व्यवसाय सुरवात करणार आहेत. सदर मंजुरी पत्र देतेवेळी इंद्रनील मोरे (सहायक शाखाधिकारी) अशोक अनंत्रे, दीपाली गडगे व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. बचत गटाच्या महिला सभासदांना कर्ज मिळवून देण्यात ग्रामपंचायत सदस्या वैशाली देवकर व कल्पवृक्ष महिला बचत गट प्रमुख संगीता तळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. महा ई. सेवा केंद्र चालक व बँक सखी सायली चासकर यांनी कार्यक्रमादरम्यान महिला सशक्तीकरण, अटल योजना, जीवन विमा याबाबत मार्गदर्शन केले.