राजुरीतील ग्रंथालयास पंचवीस हजारांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरीतील ग्रंथालयास पंचवीस हजारांची भेट
राजुरीतील ग्रंथालयास पंचवीस हजारांची भेट

राजुरीतील ग्रंथालयास पंचवीस हजारांची भेट

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २३ : राजुरी (ता‌. जुन्नर) येथील जनता विकास मंडळ संचलित विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरीच्या ग्रंथालयास सुमारे २५,००० रुपयांची पुस्तके भेट दिली. या पुस्तकांचे वितरण बाळू औटी, संदीप औटी, अनिल औटी, सुनील औटी यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य जी.के.औटी यांच्याकडे दिली.
स्व. धोंडिभाऊ रामभाऊ औटी ग्रंथपाल भारत वाचनालय राजुरी व संचालक शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था राजुरी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने या पुस्तकांच्यावतीने वाटप केले.
गावातील तरुणांमध्ये वाचन संस्कृती वाढावी तसेच कृषी, धार्मिक, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, क्रीडा, विज्ञान अशा अनेक वाचनीय पुस्तकांविषयी त्यांना माहिती मिळावी हा त्यामागचा हेतू आहे.