Mon, Jan 30, 2023

बोरी बुद्रुकला महिलांसाठी टेलरिंग प्रशिक्षण
बोरी बुद्रुकला महिलांसाठी टेलरिंग प्रशिक्षण
Published on : 24 December 2022, 10:04 am
आळेफाटा, ता. २४ : बोरी बुद्रूक (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगाच्या तरतुदींमधून ग्रामीण भागातील महिलांना टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये गावातील ६५ गरजू महिलांना शिलाई ट्रेनिंग देण्यात येणार आहे. कौशल्य विकास कार्यक्रम सण २०२१ व २०२२ तसेच रुपश्री महिला विकास संस्था अंतर्गत गावातील महिलांसाठी राबविलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच वैशाली जाधव यांच्या हस्ते केले.
यावेळी उपसरपंच दिनेश जाधव, अविनाश गुंजाळ, अश्विनी कोरडे, कोमल कोरडे, दिलीप जाधव, नामदेव शिंदे, मनिषा औटी, गणेश औटी, मंगल डोके, सुनील जाधव, वनिता डेरे, राधिका घोलप ग्रामविकास अधिकारी बी.डी.बेंद्रे आदी उपस्थित होते.