
उंचखडक येथे बिबट्याच्या हल्ल्यात ६ शेळ्या ठार
आळेफाटा, ता.२६ : उंचखडक (ता.जुन्नर) येथील धोंडिभाऊ कणसे यांच्या गोठ्यातील सहा शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये सहा शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, याच गावातील गेल्या आठ दिवसांत बिबट्याने चार शेतकऱ्यांच्या सात शेळ्या फस्त केल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, आळे, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, कोळवाडी, वडगाव आंनद ही गावे बिबट्या पवन क्षेत्रात मोडत आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या उसाची तोडणी संपत आलेली असल्याने या भागातील बिबट्यांना लपण उरले नाही. तसेच खाद्यासाठी ते मानवी वस्तीतील पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागले आहे. यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी उंचखडकच्या सरपंच सुवर्णा कणसे यांनी केली आहे.