ऊस पीक परिसंवादामध्ये वडगावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस पीक परिसंवादामध्ये वडगावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
ऊस पीक परिसंवादामध्ये वडगावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ऊस पीक परिसंवादामध्ये वडगावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१८ : वडगाव आनंद (ता.जुन्नर) शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या ऊस पीक परिसंवादात ऊस उत्पादक शेतकरी, महाराष्ट्र राज्याचे प्रबंधक उत्तम जाधव यांनी मार्गदर्शन केले. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, आय. टी.सी.सूनहराकल तसेच डेव्हलपमेंट सपोर्ट सेन्टर, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील समर्थ रामदास बाबा सभा मंडप हा कार्यक्रम आयोजित केला होता.

आधुनिक सुविधा वापरून केलेली शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे लागवडीच्या पूर्व मशागतीपासून तर काढणीपर्यंत व्यवस्थित नियोजन केले तर एकरी १०० टन ऊस सहज निघू शकतो, असे मत जाधव परिसंवादात व्यक्त केले.

यावेळी वडगाव आनंद सोसायटीचे अध्यक्ष सचिन वाळुंज, उपाध्यक्ष प्रमोद गडगे, माजी उपसरपंच प्रगतशील शेतकरी नारायण नाना वाळुंज, उपसरपंच नितीन वाळुंज, अनुराधा गडगे, सुभाष देवकर, रमेश देवकर, रामू नाना देवकर, नवनाथ भाऊ वाळुंज, शशिकांत वाळुंज तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निमेश वाळुंज यांनी सूत्रसंचालन तर तसेच डेव्हलपमेंट सपोर्ट सेन्टरचे कृषी सहायक ओंकार पठारे व प्रमोद गडगे यांनी आभार मानले.

02499