बोरी बुद्रुकच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी बुद्रुकच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन
बोरी बुद्रुकच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन

बोरी बुद्रुकच्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १७ : ‘‘बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) गावाला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला असून, भविष्यात या गावात मोठे टुरिझम सेंटर तयार होणार आहे,’’ अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
बोरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या नवीन ग्रामसचिवालय या इमारतीचे भूमिपूजन आमदार बेनके व माजी आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात झाले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, माउली खंडागळे, जिवन शिंदे, सरपंच वैशाली जाधव, उपसरपंच दिनेश जाधव, प्रकाश जाधव, तबाजी शिंदे, मंगेश काकडे, ॲड. संजय टेंबे, गणेश औटी, सुनील जाधव, नामदेव शिंदे, अविनाश गुंजाळ, अश्विनी कोरडे, कोमल कोरडे, मंगल कोरडे, वनिता डेरे, राधिका घोलप, दिलीप जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे, उपाध्यक्ष सुरेश जाधव, पोलिस पाटील विघ्नेश जाधव, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बेंद्रे आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार बेनके म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्यातील युवकांना शेतीवर अवलंबून न राहावे, यासाठी पर्यटनासाठी चालना देणार आहे. तसेच, आळे ते बोरी या रस्त्यासाठी चार कोटींचा निधी प्रस्तावित असून लवकरच तो मार्गी लागेल.’’ माजी आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘बोरी गाव हे शिवकालीन गाव असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ या गावात आहे.’’
मनोहर जाधव यांनी सूत्रसंचालन; तर ग्रामपंचायतीच्या सदस्या मनिषा औटी यांनी प्रास्ताविक केले.