आळेफाटा येथे हरी ओम ग्रुपकडून शिवभक्तांसाठी अल्पोपहाराची सोय

आळेफाटा येथे हरी ओम ग्रुपकडून शिवभक्तांसाठी अल्पोपहाराची सोय

आळेफाटा, ता.२० : शिवज्योत घेऊन जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आळेफाटा चौकात शनिवारी (ता. १८) अल्पोपहाराची मोफत सोय केली होती. हरी ओम ग्रुपकडून हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत घेवून जात असतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दरवर्षी नगर-कल्याण व पुणे - नाशिक महामार्गावर शिवभक्तांना अल्पोहार देण्यात येतो.

आळेफाटा चौक मार्गे नगर, बीड, नाशिक, औरंगाबाद येथील अनेक शिवभक्त हे शिवजन्म सोहळ्यासाठी एक दिवस अगोदर मुक्कामी शिवनेरी किल्ल्याकडे जातात. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चौकात भक्तांची गर्दी असते. हरी ओम ग्रुपकडून दरवर्षी या भक्तांसाठी अल्पोपहाराची सोय केली जाते. यंदा हरी ओम ग्रुपचे अखंडपणे सातचे वर्ष असून १७ हजार शिवभक्तांनी आळेफाटा चौकात खिचडीचा आस्वाद घेतला आल्याचे हरी ओम ग्रुपकडून सांगण्यात आले. यावेळी आळेफाटा पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकात गर्दी होऊ नये म्हणून चोक बंदोबस्त ठेवला होता.

02524

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com