आळे येथील ‘ज्ञानेश्वर ग्रामोन्नती’ निवडणुकीत चुरस

आळे येथील ‘ज्ञानेश्वर ग्रामोन्नती’ निवडणुकीत चुरस

आळेफाटा, ता. २२ ः जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य समजली जाणारी आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती शिक्षण मंडळाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत संत ज्ञानेश्वर माऊली पॅनेल आणि संत ज्ञानेश्वर महाराज स्वाभिमान पॅनेलचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. या शैक्षणिक संस्थेत दोन हजार ७२५ मतदार असून १७ जागांसाठी ६५ जणांनी अर्ज दाखल केले होते. यामधून २९ जणांनी माघार घेतली असून ३६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या १७ जागांसाठी रविवारी (ता. २६) मतदान होणार आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष भाऊदादा कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर माऊली पॅनेलचे भाऊ लक्ष्मण कुऱ्हाडे, उल्हास सावळेराम सहाणे, जनार्दन गुंजाळ, उदय शिवाजी भुजबळ, नीलेश नामदेव भुजबळ, बाळू देवराम गुंजाळ, रोहिदास विठ्ठल निमसे, शांताराम रंगनाथ कुऱ्हाडे, रोहिदास देवराम पाडेकर, गणेश सखाराम कुऱ्हाडे, विनोद चांगदेव शेळके, संजय बबन गुंजाळ, संजय नारायण खंडागळे, शरद विठ्ठल गाढवे, रवींद्र निवृत्ती डावकर, तुषार बबन कुऱ्हाडे आणि संदीप ज्ञानेश्वर पाडेकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
तर, दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्ना डोके, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके, संस्थेचे माजी अध्यक्ष किशोर कुऱ्हाडे, माजी उपसरपंच धनंजय काळे, विद्यमान सरपंच प्रीतम काळे यांच्या नेतृत्वाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्वाभिमान पॅनेलचे अजय केरूभाऊ कुऱ्हाडे, अर्जुन सखाराम पाडेकर, अरुण पोपट हुलवळे, बबन रावजी सहाने, बाबूराव कान्हू कुऱ्हाडे, बापू नरसू गाढवे, देविदास महेंद्र पाडेकर, दिनेश महिपत सहाणे, जीवन रामदास शिंदे, कैलास गेणभाऊ शेळके, प्रदीप कुमार गुंजाळ, रमेश गोविंद कुऱ्हाडे, सम्राट संजय कुऱ्हाडे, सौरभ नेताजी डोके, किशोर बापूराव कुऱ्हाडे, शांताराम कान्हू कुऱ्हाडे, शिवाजी गेणभाऊ गुंजाळ हे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. याशिवाय स्मिता पाडेकर व संतोष गुंजाळ हे दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीकडे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून रागिणी खडके या काम पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com