
आळेफाटा येथे विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन
आळेफाटा, ता. २३ : येथील शिवछत्रपती माध्य.विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता भारत भवन मंगल कार्यालयात करिअर विषयक मार्गदर्शन व शुभेच्छा समारंभाचे आयोजन केले होते.
यावेळी एरिओटिक आय. टी. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंतराव खोकले, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंद्रकांत डोके, शिवाजी शिंदे, सोमनाथ गडगे, विघ्नहर सह. साखर कारखान्याचे माजी संचालक सुरेश गडगे, सूर्यकांत चासकर, संचालक तुषार कदम, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेनचे अध्यक्ष रो. संपत राहाणे, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे अध्यक्ष रो. ज्ञानेश जाधव, पालक रो. राजेंद्र बोऱ्हाडे, विश्वास कुऱ्हाडे, पांडुरंग लामखडे, राष्ट्रीय महिला मानवाधिकार आयोगाचे जुन्नर तालुका अध्यक्ष विनोद खैरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक इम्तियाज मुलाणी यांनी केले. तर सूत्रसंचालन लक्ष्मण डुंबरे यांनी केले व आभार कैलास शिंदे यांनी मानले..