राजुरीच्या शाळेला संस्कार क्षम शाळा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरीच्या शाळेला संस्कार क्षम शाळा पुरस्कार
राजुरीच्या शाळेला संस्कार क्षम शाळा पुरस्कार

राजुरीच्या शाळेला संस्कार क्षम शाळा पुरस्कार

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २६ : राजुरी (ता. जुन्नर) येथील विद्या विकास मंदिर या विद्यालयाला संस्कार क्षम शाळा पुरस्काराने गौरविले आहे.
आशिया मानवशक्ती विकास संस्था पुणे व आदर्श गाव हिवरे बाजार यांच्यावतीने दिला जाणारा स्वामी विवेकानंद संस्कार क्षमशाळा हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते व पोपटराव पवार, सुदामा मोरे, बाजीराव सातपुते, छबूराव ठाणे, विमल ठाणगे यांच्या उपस्थितीत दिला.
हा पुरस्कार जनता विकास मंडळाचे उपाध्यक्ष बबन हाडवळे, खजिनदार शाकीरभाई चौगुले, ज्ञानेश्वर गटकळ, प्राचार्य जि.के.औटी यांनी स्वीकारला. याप्रसंगी डी.एन.नायकवडी, पर्यवेक्षक सुनील पवार, अशोक राहींज, राजेंद्र शहाने, किरण औटी, राजेंद्र गाडेकर, गंगाधर सहाने, अंगद उदमले आदी उपस्थित होते.