ॲग्रो किंग बोरी फायटरने पटकविला हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲग्रो किंग बोरी फायटरने पटकविला हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
ॲग्रो किंग बोरी फायटरने पटकविला हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

ॲग्रो किंग बोरी फायटरने पटकविला हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१ : बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील स्व.काशिनाथ भागूजी शिंदे, स्व. संजय व स्व.शेखर शांताराम शिंदे यांच्या स्मरणार्थ हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम क्रमांक ॲग्रो किंग बोरी फायटरने पटकविला.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक कोपरे मांडवे, तृतीय क्रमांक साकुर गावाने, चतुर्थ क्रमांक ओझर संघाने मिळविला. सिद्ध विकास शिंदेमळा यांनी पाचवा क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेत हडपसर, खडकी पिंपळगाव, ओझर, ओतूर, संगमनेर, मंगरूळ पारगाव, कोपरे मांडवे, पिंपळवंडी व स्थानिक मिळून १६ संघांनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेसाठी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक तबाजी शिंदे, नामदेव शिंदे, बाळासाहेब शिंदे, उपसरपंच दिनेश जाधव, युवराज कोरडे ग्रामपंचायत सदस्य नामदेव शिंदे गणेश औटी, मनीषा औटी, वनिता डेरे, अमोल जाधव, सिद्धेश्वर कमलामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे, ऋषिकेश जाधव, समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. पंच म्हणून दिलीप कुटे, इरफान शेख यांनी काम पाहिले आहे.