
आळेफाटा येथील शाळेत विज्ञान प्रदर्शन
आळेफाटा, ता. ४ : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवछत्रपती नगर विकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सोमनाथ गडगे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गडगे, सूर्यकांत चासकर, तुषार कदम, रघुनाथ चव्हाण, राजेंद्र बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी विज्ञान विषयाच्या शिक्षिका मंदाकिनी गंभिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आर्या अनिल गडगे या विद्यार्थिनीच्या सेव अर्थ या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक मिळाला. तर श्रीनाथ राजेंद्र बोऱ्हाडे व श्रेयश योगेश भुजबळ यांच्या सोलर सिस्टिम या प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला. तर श्रुतिका संदीप शिरतर या विद्यार्थिनीच्या प्रोजेक्टला तृतीय क्रमांक मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी आवड निर्माण व्हावी व यातूनच भावी शास्त्रज्ञ निर्माण व्हावे यासाठी हे प्रदर्शन भरविल्याची माहिती विजय नवले यांनी दिली.