बोरी ते जांबुतफाटा रस्त्याचे साइट पट्टे भरण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी ते जांबुतफाटा रस्त्याचे साइट पट्टे भरण्याची मागणी
बोरी ते जांबुतफाटा रस्त्याचे साइट पट्टे भरण्याची मागणी

बोरी ते जांबुतफाटा रस्त्याचे साइट पट्टे भरण्याची मागणी

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ८ : जांबुत फाटा ते बेल्हा हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-८ असून हा रस्ता पुणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणारा रस्ता असल्याने येथे मोठ्याप्रमाणात वाहतूक असते. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळून दुरुस्तीचे काम देखिल झाले आहे‌. परंतु, साईटपट्ट्या न भरल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत.
या परिसरात उसाचे मोठे श्रेत्र असल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची वाहतूक या रस्त्याने केली जात आहे. या रस्त्याच्या कडेला असलेल्या साइडपट्ट्या खोल असल्याने अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. साइडपट्टी खोल असल्याने जड वाहने खाली उतरायची कोणी या कारणांमुळे अनेक वेळा वाहनचालकांमध्येच बाचाबाची होताना दिसून येत आहे. तरी संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर साइडपट्ट्यांवर मुरूम भरावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव व राजेंद्र भोर यांनी केली आहे.