
आळे येथे तणावमुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन
आळेफाटा, ता. १० : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानराज ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मनःशक्ती केंद्र लोणावळा यांच्या माध्यमातून विद्यार्थी पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी तणावमुक्त यश कसे संपादन करता येईल यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनीषा बनकर, डॉ. ज्योती पवार उपस्थित होत्या. याप्रसंगी छाया वाव्हळ, डॉ. दीपाली हिंगमिरे, दीप्ती डोके, द्वारका परदेशी, उज्वला शिवेकर, प्रभावती शिंदे, रोशनी डोके संस्थेचे अध्यक्ष नेताजी डोके, सचिव दिलीप वाव्हळ, कार्याध्यक्ष धनंजय काळे, संचालक सुधीर वाव्हळ, पांडुरंग वाघचौरे, सुरेश शिंदे, प्राचार्य गुलाब बोऱ्हाडे, गोरक्ष काळे, सोपान शिंदे, मनीष शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल डोके यांनी तर आभार समता हांडे यांनी मानले.