
राजुरी येथे शिवरायांना अभिषेक
आळेफाटा, ता.११ : राजुरी (ता.जुन्नर) येथे हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरसेनापती हंबीरराव मोहिते हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी शिवरायांना अभिषेक घालून महिलांनी पाळणा गायला.
किल्ले शिवनेरीहून आणलेल्या शिवज्योतीचे व शिवरायांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वच महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. महिला व पुरुष यांचा भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, एम. डी. घंगाळे, एकनाथ शिंदे, संजय गवळी, हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मुरलीधर औटी, बाळासाहेब हाडवळे, चंद्रकांत जाधव, जयसिंग औटी, विशाल डुंबरे, श्रीहरी हाडवळे, धिरज औटी, रविराज गाडगे, गिरीश हडवळे, सीताराम कणसे, धनंजय औटी, सुहास डुंबरे गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात
02602