आळेफाटा येथील शिबिरात १४८ जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा येथील शिबिरात १४८ जणांची तपासणी
आळेफाटा येथील शिबिरात १४८ जणांची तपासणी

आळेफाटा येथील शिबिरात १४८ जणांची तपासणी

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१२ : येथील (ता. जुन्नर) चैतन्य हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक शिबिर पार पडले. यावेळी १४८ जणांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन, लोकमान्य हॉस्पिटल जेरीवल, सुयोग डायग्नॉस्टिक सेंटर व ओम चैतन्य हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले होते.

शिबिराचे उद्‌घाटन अमित वल्लभ बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मोहन पाटील भुजबळ, डॉ. प्रदीप गुंजाळ, डॉ. नीलेश कराळे, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. श्रीरंग गोडबोले, डॉ. संग्राम देशमुख, डॉ. राहुल बिजवे, रोटरी प्रेसिडेंट संपत रहाणे, उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, रो.मोहन जाधव, प्रदीप भुजबळ, गणेश मेहेर, सुधीर नरवडे, विशाल भुजबळ पाटील, संपत रहाणे अजित घाग, प्रसाद डोळे, राज सावंत, सुयोग डायग्नॉस्टिक सेंटरचे राजेंद्र बोऱ्हाडे, सचिन शेळके,अजय कुऱ्हाडे बाबू कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, २४ रुग्णांवर शिबिरांतर्गत सांधेरोपणाची ७५ टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. संदीप वाघोले यांनी सूत्रसंचालन तर शिवाजी गोरे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.

02604