Sun, May 28, 2023

बांगरवाडी येथे
वाळूसाठा जप्त
बांगरवाडी येथे वाळूसाठा जप्त
Published on : 14 March 2023, 2:16 am
आळेफाटा, ता. १४ : बांगरवाडी (ता. जुन्नर) या ठिकाणी अवैधरीत्या साठवून ठेवलेला वाळूसाठा महसुल विभागाने जप्त केला.
जुन्नर महसूल विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास बांगरवाडी गावाच्या हद्दीतील गणविहिर शिवारातील ओढ्यालगत असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या शेतात अंदाजे ८ ते १० ब्रास मातीमिश्रित अवैध वाळू साठा केल्याचे आढळून आले. या कारवाईत जप्त केलेला वाळूसाठा जेसीबी मशिनच्या साहाय्याने उचलून जुन्नर येथील महसूल भवन येथे ठेवण्यात आला. ही कारवाई जुन्नर तहसीलदारांच्या आदेशानुसार प्रल्हाद पाटील, शिवाजी जाधव, अनिल महाजन, राजेंद्र केदारी, विशाल उत्तर्डे, धनाजीराव भोसले, दत्तात्रेय लोंढे, शरद दोरक, राजू बढे यांनी केली.