
वडगाव आनंद शाळेत चिमुकल्यांचा कलाविष्कार
आळेफाटा, ता. १८ ः वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चिमुकल्यांचा बालआनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सदस्य जिवन शिंदे, चारूदत्त साबळे, उदय पाटील भुजबळ, दिगंबर घोडेकर, मंगेश काकडे, सचिन वाळूंज, कैलास वाळूंज, विमलेश गांधी, सुधीर नरवडे, संतोष कोठारी, महावीर पोखराणा, योगेश गडगे, बाळशिराम देवकर, संतोष वाळूंज, सुरेश शिंदे, ॲड. रवींद्र देवकर, वैशाली देवकर, डॉ. संजय देवकर आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी लावणी, कोळी गिते, भारूडे सादर केली, त्याचबरोबर सामाजिक समस्येवर आधारित ‘दारूबंदी झालीच पाहिजे’ हे बालनाट्यही सादर केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश वाळुंज, सचिन देवकर, सतीश भिंगारदिवे, बबन शिंदे, दीपाली गडगे, रेश्मा कुटे, सुवर्णा नरवडे, वैशाली वाळुंज, दत्तात्रेय दांगट या सदस्यांनी, तसेच सुनील ठिकेकर, अश्विनी हाडवळे, वृषाली कालेकर, मनिषा इले, गौरी डुंबरे या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कुदळे यांनी केले. प्रास्ताविक डि. बी. वाळुंज यांनी, तर आभार संदेश काशिकेदार यांनी मानले.
-------------------