बोरी-आळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

बोरी-आळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

आळेफाटा, ता. २० : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक ते आळे या रस्त्याची दुरवस्था झालेली असून, त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी या परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
आळेफाटा (ता. जुन्नर) या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी येण्याजाण्यासाठी बोरी बुद्रुक गावाच्या परिसरातील जाधववाडी, शिरोली, सुलतानपूर, तांबेवाडी, माळवाडी, साळवाडी आदी गावांमधील ग्रामस्थांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. बोरी बुद्रुक ते आळे या दोन गावांमधील अंतर सुमारे तीन चार किलोमीटरचे असून, या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली आहे. परंतु, बोरी बुद्रुक ते आळे या रस्त्याची अतिशय दुरवस्था झालेली असून, ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत. ते चुकविण्याच्या नादात अनेक वेळा लहान-मोठे अपघात या रस्त्यावर होत आहेत. त्यातच येथील काही ग्रामस्थांनी पाइपलाइन करण्याकरिता रस्ता खोदला. मात्र, काम झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावर माती टाकून तसेच सोडून दिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहने जाऊन मोठाले खड्डे झालेले आहे. ते अपघाताला निमंत्रण देत आहेत.
तसेच, या रस्त्याचे रुंदीकरण देखील व्हावे, अशी मागणी होत आहे. या रस्त्यावरून मोठाल्या वाहनांना खूप अडचणी येत आहेत. समोरासमोरून जर दोन वाहने आली तर खाली कोणी उतरायचे, यावरुन वाहनचालकांमध्ये अनेक वेळा वाद होत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com