बिबट्याच्या हल्ल्यात राजुरी येथे शेळी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या हल्ल्यात 
राजुरी येथे शेळी ठार
बिबट्याच्या हल्ल्यात राजुरी येथे शेळी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात राजुरी येथे शेळी ठार

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २१ : राजुरी (ता. जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली.
राजुरी येथील खराडी मळ्यात राहात असलेले मंगेश गोपीनाथ औटी यांच्या शेतावर सोमवारी (ता. २०) मेंढपाळांचा वाडा मुक्कामासाठी आला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने वाड्यातून एका शेळीला ओढत बाजूला असलेल्या शेतात फरफटत नेले. त्यावेळी शेळीचा आवाजाने मेंढपाळास जाग आल्याने त्याने मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. परंतु, शेळी जागीच ठार झाली होती. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी त्रिंबक जगताप, स्वप्नील हाडवळे यांनी येऊन पंचनामा केला.
दरम्यान, राजुरी गाव हे बिबट्या प्रवण क्षेत्रात मोडत असल्याने बिबट्याचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात दररोज कुठेना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ला होत आहे. बिबट्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.