साळवाडी येथील ब्रह्मा सागाची लागवड लक्षवेधी

साळवाडी येथील ब्रह्मा सागाची लागवड लक्षवेधी

आळेफाटा, ता.२६ : साळवाडी (ता.जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी संपत गणपत चिंचवडे यांनी ब्रम्हा जातीच्या सागाची चारशे रोपांची लागवड केली आहे. जिल्ह्यात प्रथमच असा जातीच्या लागवडीचा दीड एकर क्षेत्रामधील प्रयोग लक्षवेधी ठरला आहे. सागाच्या रोपांवर कुठल्याही प्रकारची औषध फवारणीचा खर्च शून्य असून, रोपांमध्ये कोणतेही आंतरपीक घेता येते. यामुळे हमखास दुहेरी उत्पन्न मिळणार असल्याचा विश्‍वास चिंचवडे कुटुंबांना आहे.

लाकडांचा राजा म्हणून सागाला ओळखले जाते. अत्यंत टिकाऊ अशा लाकडाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी असते. सागाच्या देशी, मलेशियन, मलबारी आदी प्रकारचे सागवान पूर्णपणे तयार व्हायला सुमारे पंधरा ते वीस वर्षे लागतात. परंतु टिशू कल्चर ब्रम्हा साग आठ ते दहा वर्षातच काढायला येतो. याची हैदराबाद राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड होते.

चिंचवड यांनी दीड एकर क्षेत्राची निवड केली. चार ते पाच ट्रॉली शेण खत पांगवले व आठ बाय आठचे अंतर ठेऊन ट्रॅक्टरच्या मदतीने बेड पाडले.


एका झाडापासून बारा घनफूट लाकूड
संपत चिंचवडे यांनी जबलपूरहून पंचेचाळीस हजार रुपयांची चारशे रोपे आणली. चार ते पाच फुटांचे अंतर ठेवून लावली. रोपांची उंची दहा वर्षात चाळीस ते पन्नास फुटापर्यंत जाते. एका झाडापासून दहा ते बारा घनफूट लाकूड मिळते.

असा होता लाकडाचा उपयोग
* जहाज बांधणी, * रेल्वे विभागात, * खेळणी * फर्निचर

जळगाव येथे कृषी विभागाने आयोजित केलेल्या अभ्यास दौऱ्यास दोन महिन्यांपूर्वी भेट दिली होती. यामध्ये सागाची लागवडी ते काढणीपर्यंतचा अभ्यास केला व त्यानुसार ब्रम्हा जातीच्या सागाची लागवड केली. सध्या सागाला २ ते ३ हजार रुपये घनफूट बाजारभाव आहे. एका झाडापासून २० ते २५ हजार रुपये आठ ते दहा वर्षात मिळणार आहे.
- संपत चिंचवडे, सागाच्या लाकडाचे उत्पादक

02659

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com