Wed, June 7, 2023

बिबट्याच्या हल्ल्यात
राजुरीत शेळी जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात राजुरीत शेळी जखमी
Published on : 24 March 2023, 9:57 am
आळेफाटा, ता. २४ : राजुरी (ता. जुन्नर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी गंभीर जखमी झाली.
राजुरी येथील गटकळ मळ्यात राहात असलेले शरद दगडू गटकळ यांच्या शेळीवर बिबट्याने गुरुवारी (ता. २४) सायंकाळी हल्ला केला. त्यात शेळी गंभीर जखमी झाली. राजुरी येथील खराडी मळ्यातील मंगेश औटी यांच्या शेतावर आलेल्या मेंढपाळाची शेळी बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार झाला. वन अधिकारी त्रिंबक जगताप, स्वप्नील हाडवळे यांनी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीरंग बढे यांनी जखमी शेळीवर उपचार केले.
दरम्यान, राजुरी परिसरात दिवसेंदिवस दररोज कोठेना कोठे बिबट्याचा पाळीव प्राण्यांवर हल्ला होत आहे. या ठिकाणी असलेल्या बिबट्यांचा पकडण्यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.