Fri, Sept 22, 2023

राजुरी येथील शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून टिव्ही भेट
राजुरी येथील शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून टिव्ही भेट
Published on : 15 April 2023, 9:23 am
आळेफाटा, ता. १५ : राजुरी (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला
सन १९७८-७९च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एल.ई.डी टिव्ही भेट देण्यात आला.
शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात काशिनाथ औटी, लक्ष्मण औटी, नामदेव जाधव, अर्जुन हाडवळे, केरभाऊ घंगाळे, सीताराम नायकवडी, मच्छिंद्र औटी, अभिमन्यू औटी, दत्तात्रेय हाडवळे, अनंत हाडवळे, संभाजी येवले, मारुती हाडवळे या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक सयाजी हाडवळे यांच्याकडे टिव्ही प्रदान करण्यात आला.