आळे येथील जाधव महाविद्यालयात रोजगार मेळावा उत्साहात

आळे येथील जाधव महाविद्यालयात रोजगार मेळावा उत्साहात

आळेफाटा, ता. ३० : आळे (ता.जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्लेसमेंट सेल व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. यात विविध कंपन्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, संचालक किशोर कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, युवाशक्ती फाउंडेशनचे आनंद जिरगे, रविकिरण गर्भे, शिवचिदंबर उद्योग बाळासाहेब काकडे, प्रवीण बढे आदी उपस्थित होते.
जिरगे म्हणाले,‘‘ कोणत्याही क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये त्यात क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्यांची जोपासना आवश्यक आहे.’’
मेळाव्यात विविध पदवी व डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मुलाखतींद्वारे विविध कंपन्यांतून एकूण ११४ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली. त्यांना लवकरच प्रशिक्षण व नियुक्तीपत्रे संबंधित कंपन्यांकडून देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर, सदस्य प्रा. योगेश माने, प्रा. मनिषा गिरी, प्रा. सर्जेराव थोरात, प्रा. दर्शना घोलप,विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक प्रा. संतोष राठोड यांनी संयोजन केले. प्रा. संजय वाघचौरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com