
सह्याद्री अभियांत्रिकीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
आळेफाटा, ता. ३ : राजुरी (जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्ताने ‘उमंग’ २०२३ अंतर्गत सहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे संचालक सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये बैठे आणि मैदानी खेळ झाले. कबड्डी, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, रस्सी खेच इत्यादी प्रकारात विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये नृत्य, नाटक, भारुड, एकपात्री अभिनय, समाजप्रबोधन असे विविध कला प्रकार विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले. कार्यक्रमास आळेफाटा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल पवार, अमित पोळ, समाधान अहिवळे, प्रवीण लोहटे, संचालक गणपत कोरडे, खजिनदार किशोरभाई पटेल, संचालक डॉ. कर्झन भानुशाली, संचालक सचिन चव्हाण, प्राचार्य एस. बी. झोपे, उपप्राचार्य पी. बालारामडू , विभागप्रमुख प्रा. मनोज कुमार, प्रा. रांधवण भागवत, प्रा. मनिकंठम रेड्डी, प्रा. उमाकांत रेडे, प्रा. भालचंद्र मुंढे, ग्रंथपाल उद्धव भारती, प्रा. मिनाज पटेल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेक शेख, सिद्धी कुऱ्हाडे, निकिता शिंदे यांनी, तर आभार प्रा. निलिमा शिरखे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मनोज कुमार, प्रा. भागवत रांधवण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.